हरकुळ खुर्द येथील पितृछत्र व मातृछत्र हरपलेल्या खानविलकर भावंडांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती’चा मदतीचा हात

खारेपाटण (प्रतिनिधी) : हरकुळ खुर्द (खालची तेलीवाडी) येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चार अनाथ भावंडांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती धावून आली आहे. या घटनेची दखल घेत शिक्षक समितीच्या कणकवली शाखेच्या वतीने या कुटुंबाला ३०,०००/- रुपयांची आर्थिक मदत नुकतीच सुपूर्द करण्यात आली.

सामाजिक बांधिलकीतून मदतीचा धनादेश सुपूर्द
काही दिवसांपूर्वीच हरकुळ खुर्द येथील खानविलकर कुटुंबातील चार मुलांचे आई-वडील देवाज्ञा झाल्याने पोरके झाले होते. ही हृदयद्रावक घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सामाजिक बांधिलकी जपली व सोमवारी २३ मार्च रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हरकुळ खुर्द येथे जाऊन मुलांची भेट घेतली आणि त्यांच्या हाती ३० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

पुढील वाटचालीस दिले ‘अभिवचन’
केवळ आर्थिक मदतच नाही, तर या मुलांना धीर देत त्यांच्या काकांशीही पदाधिकाऱ्यांनी संवाद साधला. मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये आणि त्यांना भविष्यात कोणतीही अडचण भासल्यास संघटना सदैव पाठीशी उभी राहील, असे आश्वासक अभिवचन यावेळी देण्यात आले.

यांची लाभली उपस्थिती
या प्रसंगी शिक्षकनेते टोनी म्हापसेकर, तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, तालुका सचिव निलेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे, शिक्षक पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी, जिल्हा उपाध्यक्ष अजय तांबे, जिल्हा संघटक ईश्वरलाल कदम, कार्याध्यक्ष संतोष कांबळे, कोषाध्यक्ष प्रकाश वाडकर, प्रवक्ते विजय पाताडे, ज्येष्ठ सदस्य देऊ होळकर, प्रवक्ते विजय पाताडे, कार्यालयीन चिटणीस सुभाष गावकर, कनेडी विभागीय अध्यक्ष सुनील गावकर, ज्येष्ठ सदस्य अशोक कांबळे, माजी कार्याध्यक्ष प्रशांत दळवी, जगन्नाथ घाडीगांवकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!