कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील गवा रेड्यांचे अधिवास असलेल्या सुप्रसिद्ध दाजीपूर अभयारण्य सफारी 7 एप्रिल 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश वनविभागाकडून काढण्यात आले आहेत. दाजीपूर अभयारण्यामध्ये असलेला पर्यटन सफारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्ता दुरुस्ती कामामुळे 25 मार्च 2026 ते 7 एप्रिल 2026 दरम्यान दाजीपूर वन्यजीव अभयारण्य सफारी बंद ठेवण्याचे आदेश दाजीपूर आर. एफ. ओ. राजेंद्र घुणकीकर यांनी काढले आहेत. उन्हाळी हंगामात दाजीपूर (वन्यजीव) अभयारण्य सफारीसाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात. वन्यजीव सफारी रस्ता नादुरुस्त झाला असून पर्यटकांच्या सोयीसाठी ह्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. रस्ता दुरुस्ती काम सुरू केले असल्यामुळे 7 एप्रिलपर्यंत दाजीपूर अभयारण्य सफारी बंद ठेवण्यात आल्याचे पर्यटकांनी लक्षात घेण्याचे आवाहनही दाजीपूर वनपरिक्षेत्र (वन्यजीव) अधिकारी राजेंद्र घुनकिकर यांनी केले आहे.
दाजीपूर अभयारण्य सफारी 7 एप्रिल पर्यंत बंद












