सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा यासाठी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेच्या वतीने सावंतवाडी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देऊन यावरती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

सावंतवाडी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांना याबाबत संघटनेच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. तसेच या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यात आले आणि या प्रश्नावरती चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांना भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत आम्ही सहजग असून याबाबत योग्य तो निर्णय लवकरच घेण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच भटक्या कुत्र्यांसाठी एक शेल्टर होम सुद्धा तयार करत आहोत अशी माहिती दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत सभापती सुधीर आडिवडेकर उपस्थित होते.

सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सुद्धा सावंतवाडी शहरातील भटक्या कुत्र्यांसंदर्भात लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून सावंतवाडी शहरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात येईल असे आश्वासन दिले.

निवेदन देतेवेळी साक्षी गवस, सावंतवाडी तालुका संघटनेच्या कार्याध्यक्ष तथा नगरसेविका मोहिनी मडगांवकर, तालुका उपाध्यक्ष तथा नगरसेविका शर्वरी धारगळकर, जिल्हा महिला संघटक शिवानी पाटकर, कायदेविषयक सल्लागार ॲड. संदीप चांदेकर, मेघना साळगावकर, रेश्मा परब, सुप्रिया धारणकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!