केरवडे तर्फे माणगाव जि. प. प्राथ. शाळा व्यवस्थापन समितीची खारेपाटण केंद्र शाळा नं. १ शाळेला सदिच्छा भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” उपक्रमात तालुक्यात १ नंबर असलेली व केरवडे तर्फे माणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती व पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक यांनी ह्याच्या सरपंच श्रिया ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा नं. १ या शाळेला सदिच्छा भेट दिली.

यावेळी केरवडे तर्फे माणगाव ग्रामपंचायत सदस्य दत्ता जाधव, प्राची परब, लक्ष्मी भोई जि. प. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू परब, उपाध्यक्ष स्मिता घाडीगावकर, शाळेचे मुख्याध्यापक संजय गवस, पदवीधर शिक्षक महेश गावडे, शाळा समिती सदस्य राधिका माळी, श्रध्दा घाटकर, गोविंद नाईक, विवेक परब, दीपल जाधव, माजी विद्यार्थीनी तन्वी परब आदी मान्यवर पदाधिकारी या शाळा भेटी दरम्यान उपस्थित होते.

यावेळी खारेपाटण जि. प. केंद्र शाळेच्या वतीने शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर तसेच समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे आणि शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केरवडे तर्फे माणगाव गावचे सरपंच श्रिया ठाकूर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू परब, समिती पदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक संजय गवस व शिक्षक वृंद यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी संपूर्ण शाळेची माहिती आणि सहशालेय उपक्रमाबाबत माहिती उपस्थिताना दिली. तर या समितीने शाळेच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली व शाळेच्या एकूण कामकाजाविषयी व शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाविषयी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!