ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट साठी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन ! डिजिटल पेमेंट बद्दल प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक – योगिता मोरे (गाडे)

आरबीआय व ई-गव्हर्नन्स योगेश्वर कॉम्प्युटर अंतर्गत ग्रामीण भागात विविध ठिकाणी समाज प्रबोधन उपक्रम

फोंडाघाट (प्रतिनिधी) : समाजामध्ये विविध ठिकाणी डिजिटल फ्रॉड होत असताना, ग्रामीण भागातील लोकांना डिजिटल पेमेंट बद्दल जागरूकता निर्माण व्हावी, या व्यवहारातून कोणाचीही फसवणूक होऊ नये याकरिता भारत सरकारच्या सी. एस. व्ही./ व्ही. एल. इ. योगेश्वर कंम्प्युटर आरबीआय व ई-गव्हर्नन्स सर्विस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात जागरूकता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत त्यांनी हरकुळ खुर्द, घोणसरी, फोंडाघाट, करंजे, डांबरे येथे ग्रामस्तरीय प्रत्यक्ष जागरूकता उपक्रम पार पाडला. या उपक्रमातून डिजिटल पेमेंट व त्या व्यवहारात घ्यावयाची काळजी याबाबत प्रबोधन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना योगेश्वर कॉम्प्युटरच्या संचालिका योगिता मोरे (गाडे) यांनी डिजिटल पेमेंट करताना, प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक असून योग्य ती काळजी घ्यावी असे सांगितले. कोणती काळजी घ्यावी हे त्यांनी प्रात्यक्षिकासह स्पष्ट केले.

यावेळी हरकुळ खुर्द सरपंच राजन रासम तसेच प्रत्येक गावाचे ग्रामसेवक, घोणसरी सरपंच राणे, दीपक ईसवलकर, सागर साटम, संदीप साटम यासह स्थानिक नेते ग्रामस्थ महिला-पुरुष, युवा उपस्थित होते.

error: Content is protected !!