कासार्डे माध्यमिक विद्यालयातील कु.मंदार जाधव यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

तळेरे (प्रतिनिधी) : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षांमध्ये कासार्डे माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु.मंदार जीवदास जाधव इ.५ वी यांने घवघवीत यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थी नवोदय विद्यालयात इ.६ वी प्रवेशासाठी पात्र ठरला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्याला एस.एस. पेडणेकर,श्री.डी.इ.धोंड, पी.जी. पाताडे,एन.सी.कानकेकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले, या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका बी.बी. बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी,पालक शिक्षक संघ व माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या

error: Content is protected !!