भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडीच्यावतीने नुतन पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांचा सत्कार…!

भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर यांचा सन्मान

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावचे माजी उपसरपंच तथा नुतन पंचायत समिती सदस्य दिपक सुर्वे यांचा तसेच कांबळी दुकान ते गावडेघर या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण मंजूर करून दिलेला शब्द पाळत तात्काळ अंमलबजावणी केल्याबद्दल भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी च्यावतीने शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुनिल पवार, संदिप परब, दिगंबर जाधव, प्रकाश वराडकर, तुषार पवार, किशोर कांबळी, अनंत तोरसोळकर, पिंट्या दळवी, प्रदिप परब, दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!