कॅथॉलिक अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीला ३ कोटी ३५ लाखांचा निव्वळ नफा

३१ मार्च अखेर कॅथॉलिक पतसंस्थेची दमदार कामगिरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) : कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि. सावंतवाडी या संस्थेला ३१ मार्च २०२६ अखेर ३ कोटी ३५ लाख निव्वळ नफा झाला. संस्थेने आजपर्यंत २८० कोटी ठेवीचा टप्पा पार केला आहे. कॅथॉलिक पतसंस्थेने केवळ ३२ वर्षाच्या कार्यकाळात सर्व जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

आर्थिक स्थितीचा विचार करता संस्थेवरील सभासद ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाल्यामुळे आज मोठ्या स्वरूपाच्या ठेवी संस्थेकडे जमा होत आहेत. ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी २८० कोटी ०९ लाख, कर्ज २०७ कोटी १३ लाख, संस्थेची बँकेतील एकूण गुंतवणूक ९८ कोटी तर निव्वळ नफा ३ कोटी ३५ लाख रूपये झाला असून संस्थेने ४८८ कोटी एकत्रीत व्यवसायाचा टप्पा पुर्ण केला आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या आर्दश प्रमाणांचा त्यांच्या अंमलबजावणीसाठी नियोजनबध्द प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्याबाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केले आहे. सभासद ग्राहकांचा संस्थेवरील असलेला विश्वास हा आमच्या प्रत्येक यशाचा आधारस्तंभ आहे. संस्थेने सभासद ग्राहकांच्या प्रत्येक गरजा पुर्ण होण्याकरीता आता पर्यंत कामाची कटिबध्दता बाळगली आहे. संस्थेला सतत प्रगतीपथावर ठेवण्यास संस्थेचे सर्व निष्ठवान सभासद, ग्राहकांचे, तसेच सर्व कर्मचारी, पिग्मी व आर्वत ठेव प्रतिनिधींचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. आनमारी जॉन डिसोजा व सर्व संचालक मंडळाने मनःपूर्वक आभार मानले आहे.
}}}} बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

error: Content is protected !!