नगरसेविका आर्या राणे यांचा एक फोन आणि स्ट्रीट लाईट सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जानवली नदीनजीक पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोडवरील बंद असलेली स्ट्रीट लाईट नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी पुन्हा सुरू करून दिली. सर्व्हिस रोडवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी नगरसेविका आर्या राणे यांच्या कानावर घालत स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी केली. नगरसेविका आर्या राणे यांनी लागलीच हायवे ठेकेदार डीबीएल कंपनीच्या अभियंत्यांना स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत फोन कॉल करून तात्काळ लाईट सुरू करण्याच्या सूचना केल्या. नगरसेविका आर्या राणे यांच्या फोनची दखल घेत तात्काळ डीबीएल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बंद असलेली स्ट्रीट लाईट सुरू केली. स्ट्रीट लाईट दुरुस्त करून देत गैरसोय दूर केल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी नगरसेविका आर्या राणे यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!