मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी….
कणकवली (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बजाज ऑटोतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले होते. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात आली. निवड झालेले विद्यार्थी डिप्लोमा मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागाचे असून संस्थेसाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.या मुलाखत प्रक्रियेच्या वेळी कॉलेजचे उपप्राचार्य गजानन भोसले, मेकॅनिकल विभाग प्रमुख अभिषेक राणे, टीपीओ हेड मिलिंद देसाई, टीपीओ महेश पाटील, इलेक्ट्रिकल अधिव्याख्याता समित निर्मळकर तसेच बजाज ऑटोच्या एचआर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.












