आचिर्णेत गोळीबार एक ठार एक जखमी

मयत आणि जखमी दोघेही आचिर्णे घाणेगडवाडी तील

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका गोळीबाराने हादरला असून तालुक्यातील आचिर्णे गावात झालेल्या गोळीबारात एका युवकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. सागर सूरेश पोटळे (वय 26, रा. घाणेगडवाडी, आचिर्णे) असे मयताचे नाव असून कृष्णा सुरेश कातकर (वय 25, रा. आचिर्णे घाणेगडवाडी ) हा जखमी झाला आहे. ही घटना 7 एप्रिल रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आचिर्णे गावातील कालव्यानजीक शिकारीला गेले असताना घडल्याची चर्चा आहे. दरम्यान घटना समजताच पोलीस निरीक्षक मनोज सोनावळकर यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत प्रथमिक पाहणी केली. जखमी कृष्णा कातकर याला कणकवली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

error: Content is protected !!