माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा 

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राहणार उपस्थित

वैभववाडी (प्रतिनिधी) : 10 एप्रिल रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या या भव्य सोहळ्यास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार आहेत. 

राज्यातील विविध पक्षातील पदाधिकारी, मंत्री व दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात खासदार नारायण राणे यांनी कोकणच्या विकासासाठी दिलेल्या त्यांच्या योगदानाचा गौरव यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केला जाणार आहे.

या सोहळ्यासाठी राज्यभरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून, कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

error: Content is protected !!