वैभववाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ मुंबई ग्रामीण व माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक १३५ वा जयंती महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.

यानिमित्त सकाळी ११ वाजता धम्म ध्वजारोहण व पूजा पाठ, सकाळी ११. ३० वाजता जाहीर व्याख्यान, तर दुपारी १२ वाजता अभिवादन रॅली काढण्यात येणार आहे. तर दुपारी दीड वाजता बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे.  त्यानंतर स्नेहभोजन व समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे.असे आवाहन संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव,महिला मंडळाचे अध्यक्ष शारदा कांबळे,सेक्रेटरी रवींद्र पवार, रुचिता कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!