खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे गावातील शाळांमध्ये केक व खाऊ वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त करंजे गावातील शाळांमध्ये केक कापून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी करंजे ग्रामपंचायतीच्या सरपंच सपना मेस्त्री, उपसरपंच गजानन करंजेकर, माजी सरपंच मंगेश तळगावकर, विजय दळवी आणि राजन चिंदरकर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ चे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला.

error: Content is protected !!