फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे विद्यमान खासदार आदरणीय श्री नारायणराव राणे साहेब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त लोरे नं. 1 येथील श्री देव गांगोचाळा मंदिर येथे गणेश पूजन व अभिषेकाचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी लोरे नं. 1 व लोरे ग्रामस्थ यांच्या वतीने संपन्न झाला.
यावेळी देवस्थानातील प्रमुख मानकरी प्रभाकर रावराणे, सुमन गुरव, लोरे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच रसिका राणे, शक्ती केंद्र प्रमुख अलंकार रावराणे तसेच नरेश गुरव, सुनील रावराणे, अनमोल रावराणे, विजय रावराणे, सदानंद गुरव, भाऊ नवले, हरिश्चंद्र जाधव, विजय गुरव, मुकुंद गुरव, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती रावराणे, रघुनाथ रावराणे, राकेश गांधी, सुरेश एकावडे,संतोष कदम, सचिन गुरव, प्रकाश गुरव दयानंद गुरव, प्रमोद तेली, संतोष तेली, कृष्णा गुरव आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी लोकनेते आदरणीय नारायण राणे यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे,अशी प्रार्थना करण्यात आली.











