आचरा (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी मालवण ग्रामीण मंडल अध्यक्ष पदी वायंगणी गावची सुकन्या व गावच्या उपसरपंच ॲड. समृद्धी आसोलकर यांची काही दिवसांपूर्वी निवड करण्यात आली होती. त्यानिमित्ताने वायंगणी महायुतीच्या वतीने ॲड. समृद्धी आसोलकर यांचा सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य शामसुंदर नाईक, रावजी सावंत, बाळू वस्त, प्रमोद कदम, विकी सावंत, गणेश सावंत, गणेश धुळे, पोलिस पाटील सुनील त्रिंबककर, अशोक वायंगणकर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
महायुतीच्या वतीने नुतन भाजप महिला ग्रामीण तालुकाध्यक्ष ॲड. समृद्धी आसोलकर यांचा सत्कार…!












