अमृतमहोत्सवात पदार्पण …75 पुस्तकांची भेट

खा. राणेंना नारकर दाम्पत्याकडून पुस्तकभेट

देवगड (प्रतिनिधी) : कोकणचे भाग्यविधाते लोकनायक आदरणीय खासदार नारायण राणे यांचा अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळा मोठ्या दिमाखात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपन्न झाला. खासदार नारायण राणे यांना अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना जिल्हा परिषद महिला बालविकास सभापती अनुराधा नारकर आणि भाजपा पडेल मंडल अध्यक्ष महेशकुमार नारकर या दाम्पत्याने 75 पुस्तकांची भेट दिली. खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पण वर्षात भेटवस्तू अथवा पुष्पगुच्छ देण्याऐवजी ग्रंथ भेट द्यावी असे आवाहन महायुती च्या नेत्यांकडून करण्यात आले होते. खासदार राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रंथालयांना सिंधुदुर्गवासीयांच्या माध्यमातून 5 हजार पुस्तके भेट देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार नारकर दाम्पत्याने 75 पुस्तकांची भेट खासदार नारायण राणे यांना 74 व्या वाढदिवसानिमित्त देऊन आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!