खा.नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पणनिमित्त खारेपाटण विभागातील ५५० विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन

कट्टर राणे समर्थक सामाजिक कार्यकर्ता रफीक नाईक आणि खारेपाटण भाजपा विभागाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : खा. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पण वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथील खारेपाटण भाजपा पक्ष विभाग व सामाजिक कार्यकर्ते, राणे समर्थक रफिक नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १० एप्रिल रोजी खारेपाटण आणि परिसरातील असणाऱ्या जि. प शाळांमधील ५५० विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.यामध्ये खारेपाटण केंद्रशाळा, खारेपाटण बंदरगावउर्दू शाळा, काजिर्डे उर्दू शाळा आणि नडगिवे, वारगाव, शिडवणे, चिंचवली मधील जि. प शाळा यां जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निम्मिताने शालेय विद्यार्थ्यासमवेत केक कापून तसेच जि. प. शाळेतील मुलांना भोजना ची सोय केली….. नारायण राणे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अमृतमहोत्सवी वर्ष स्वागत समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने या वाढदिवसाच्या निम्मिताने पुष्पगुच्छ हार भेट न देता पुस्तकं भेट देण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे माजी वित्त व बांधकाम सभापती रवींद्र जठार यांनी स्पष्ट केले.नारायण राणे यांना वाचनाची आवड असून भेट म्हणून मिळालेली सर्व पुस्तकं ही ग्रंथालयात जमा करून ती विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीसाठी अमूल्य ठरतील असा संदेश तथा हेतू या उपक्रमातुन साध्य करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतं आहे. खारेपाटण मधील सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, यांनी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना करण्यात आली.या कार्यक्रम प्रसंगी माजी वित्त व बांधकाम सभापती -रवींद्र उर्फ बाळा जठार, सामाजिक कार्यकर्ते -रफिक नाईक, माजी पं. स. सदस्या -तृप्ती माळवदे,महिला तालुका प्रमुख -उज्वला चिके ,शक्ती केंद्र प्रमुख -सुधीर कुबल,शक्तिकेंद्र प्रमुख-सूर्यकांत हरिश्चंद्र भालेकर, संकेत शेट्ये, महेश कोळसुलकर, संकेत लोकरे, सागर वाडेकर, चिंचवली सरपंच -अशोक पाटील उपसरपंच -राजेंद्र पेडणेकर पोलीस पाटील -दिगंबर भालेकर, भाजपा बुथ कमिटी अध्यक्ष-रवींद्र गुरव ,शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिंचवली मधली वाडी -साक्षी श्रीकृष्ण भालेकर, दर्शना गुरव- उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी प्रतिनिधी कुमार -पार्थ श्रीकृष्ण भालेकर कुमारी- समृद्धी राजेंद्र भालेकर, शाळा चिंचवली मधलीवाडी मुख्याध्यापक -गोरक्षनाथ किसन गायकवाड, व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!