वन्यप्राण्यांपासून फळझाडांच्या नुकसानीबाबत भरपाई आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मुंबईत बैठक संपन्न

प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी , आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाली बैठक

नितेश राणे एकमेव आमदार होते बैठकीला उपस्थित

सिंधुदुर्गसह कोकणातील बाधित शेतकऱ्यांना मिळणार न्याय

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : महसूल आणि वनविभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी यांच्यासोबत आमदार नितेश राणे यांच्या मुंबई येथे आज झालेल्या बैठकीत वन्यप्राण्यांमुळे कोकणातील आंबा काजू फणस नारळ सुपारी तसेच फुलझाडांचा मोहोर पालवी आदींचे होणारे नुकसान व भरपाई बाबत धोरण ठरविण्यासाठी महत्वपूर्ण बैठक झाली.या बैठकीत वन्यप्राण्यापासून होणारे शेतकऱ्यांचे नुकसान तसेच नुकसानीचे क्षेत्र नुकसानीचे प्रमाण आदीच्या आधारे नुकसानीचे मूल्य निश्चित करण्याची कार्यपद्धती ठरविणे आदी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.या बैठकीत आमदार नितेश राणे यांनी देवगड हापूस सह सिंधुदुर्गातील हत्तीबाधित तसेच गवा, रानडुक्कर आदींसह अन्य वन्यप्राण्यांमुळे होणारे शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मुद्दा प्रामुख्याने मांडला.याबाबत सविस्तर चर्चा होऊन वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या फळझाडे, फुलझाडे तसेच शेतनुकसानीची शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळण्यासाठी कार्यपद्धतीबाबत निर्णय घेण्यात आला.

error: Content is protected !!