शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम (लाठी-काठी) स्पर्धेचे 28 जानेवारीला आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग तर्फ जिल्हास्तरीय शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारी 2023 रोजी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथमच शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जास्तीत जास्त खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा थाय बॉक्सिंग व सिलंबम (लाठी-काठी ) असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्या. विवेक राणे व सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी मा. विद्या शिरस मॅडम यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये सेल्फ डिफेन्स व मार्शल आर्ट्स चा प्रचार होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी योग्य ते सहकार्य केले जाईल तसेच जास्तीत जास्त खेळाडूंनी नोंदणी करून सहभागी व्हावे असे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली व अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई च्या सेक्रेटरी मा. सुलेखा राणे मॅडम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!