रवळनाथ मंदिराजवळील चौकाला ‘वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक’ नाव देण्याची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील रवळनाथ मंदिर नजीक असलेला चौक हा शहरातील एक महत्त्वाचा व वर्दळीचा भाग आहे. सदर चौकास राष्ट्राभिमान व इतिहासाची जाणीव जपणाऱ्या महान योद्धा वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक राकेश राणे यांनी
मुख्याधिकारी गौरी पाटील व नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याकडे केली आहे.

यावेळी नगरसेवक स्वप्निल उर्फ दाटू राणे, नगरसेविका आर्या राणे उपस्थित होत्या. यावेळी राकेश राणे यांनी महाराणा प्रताप यांनी आपल्या शौर्य, पराक्रम व स्वाभिमानासाठी संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्याची आठवण कायम राहावी व नव्या पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी सदर चौकास “वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक” असे नाव देण्यात यावे अशी विनंती असल्याचे मुख्याधिकारी गौरी पाटील व संदेश पारकर यांना सांगितले. यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आपण आपल्या मताशी सहमत आहोत, या संदर्भात कुठलीही मदत लागली तर मी आणि नगरपंचायत प्रशासन आपल्या सोबत आहोत. आपण नक्कीच त्या संदर्भात निर्णय घेऊ असे आश्वासन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिले आहे.

error: Content is protected !!