तळेरे एस. टी. बस स्थानकला कार्यालयीन कपाट भेट
खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकिसरे ता. वैभववाडी गावचे सुपुत्र तथा महाराष्ट्र राज्य एस. टी. महामंडळ कणकवली आगाराचे सेवा निवृत्त माजी वाहतूक निरीक्षक अशोक उर्फ बी. एल. जाधव यांनी आपल्या दिवंगत आई मायावती व लक्ष्मण आणि भाऊ रवींद्र जाधव यांच्या स्मरणार्थ नुकतेच तळेरे एस. टी. बसस्थानकला एक मोठे कार्यालयीन कपाट भेट म्हणून दिले. बी. एल. जाधव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून दि. १४ एप्रिल २०२६ रोजी हे कपाट तळेरे एस. टी. बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रमुख अविनाश दळवी यांचेकडे सुपूर्द केले. यावेळी कणकवली आगाराचे स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, माजी वाहतूक नियंत्रक अरुण भांबुरे, बुरंबावडे गावचे माजी सरपंच रवींद्र शिंगे, तळेरे बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक अविनाश दळवी, सुशील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. सदरील कार्यालयीन कपाट बुरंबावडे गावचे माजी सरपंच रवींद शिंगे यांच्या शुभहस्ते तळेरे बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक प्रमुख अविनाश दळवी यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले. तळेरे एस. टी. बस स्थानकाला अत्यावश्यक असणारे कार्यालयीन कपाट बी. एल. जाधव यांनी भेट दिल्याबद्दल त्यांचे तळेरे ग्रामस्थ व एस. टी. महामंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.












