जय श्रीराम ! पवनपुत्र हनुमान की जय ss चा जयघोष!
” बायकोशिवाय काय खरा नाय ” फोंडाघाटच्या विठ्ठल सावंत यांच्या मालवणी नाट्याला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद !
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील करूळ चव्हाटा येथील जागृत हनुमान मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात पार पडले. सकाळपासूनच मंदिराला फुलांची आरास, नेत्रदीपक विद्युत रोशणाई आणि हनुमान चरित्र, सुस्वर भक्ती – भावगीतांनी चव्हाटा मंदिर परिसर बहरला होता. सकाळी रामभक्त हनुमान वर अभिषेक, पूजाअर्चा संपन्न झाली.त्यानंतर महाआरती व महाप्रसाद पार पडला. मध्यंतरीच्या वेळी स्थानिक मंडळांची सुस्वर भजने होत होती..
रात्री चंद्रभागा प्रोडक्शन प्रस्तुत आणि फोंडाघाटचे सुपुत्र विठ्ठल सावंत लिखित, शेखर गवस दिग्दर्शित व सुनिता साळोखे निर्मित, श्री साई गणेश मित्र मंडळ– कलमठ यांनी धमाल विनोदी, दोन अंकी मालवणी नाटक, ” बायको शिवाय काय खरा नाय ” हे नाटक रसिक प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाले. ग्रामस्थांच्या उपस्थितीत आणि युवाईच्या सहकार्यातून प्रथम वर्धापन दिन यशस्वीरित्या पार पाडण्यात आला…












