माजी आमदार प्रमोद जठार यांची भाजपा प्रवक्तेपदी नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केली नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी आमदार तथा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी 21 एप्रिल रोजी नियुक्ती आदेश काढले आहेत. भाजपा प्रदेश च्या वतीने 21 एप्रिल रोजी संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यामुळे पक्ष संघटनात्मक तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांबाबत प्रमोद जठार पक्षाच्या वतीने अधिकृत भूमिका माध्यमांसमोर मांडतील. प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल जठार यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!