शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची उपस्थिती
चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गावातील कर्ली नदीकिनारी काळसे तर येथे सुसज्ज जेटी बांधण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी जि. प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, पंचायत समिती सदस्य प्रिया बावकर, काळसे सरपंच विशाखा काळसेकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण माडये, सुजाता परब, ख़ुशी राऊळ, सुशील काळसेकर, माजी सरपंच केशव सावंत, रंगनाथ आजगावकर, शिवसेना काळसे परबवाडा शाखाप्रमुख विपुल माळगावकर, काळसे माळकेवाडी शाखाप्रमुख रमेश मयेकर, काळसे बागवाडी शाखाप्रमुख गणेश जावकर, भाजप बूथ कमिटी अध्यक्ष कमलाकर आजगावकर, ग्रामस्थ अण्णा गुराम, बाळकृष्ण प्रभु, चिंतामणी प्रभु, बाबू कोळगे, तुकाराम केळजी, सचिन सावंत, प्रज्वल प्रभु, लक्ष्मण म्हापणकर, संतोष वालावलकर, विजय प्रभु, मनोज काळसेकर, हनुमंत परब शैलेश हळदणकर, सुधीर केळुसकर सुहास घाडी, दत्ताराम मुणगेकर, दिनेश नांदोसकर, अनिल परब, विलास परब, नाना राऊळ, दाजी परब, आबा दळवी राजेश प्रभु, संतोष म्हापणकर, लक्ष्मण कोळगे, विलास घाडी, राजू परब, काका प्रभु, दिनेश काळसेकर, श्रीकृष्ण भाटकर, आणि ठेकेदार मनोज वायंगणकर आदी जण उपस्थित होते.
काळसे गावातील सुमारे 60% गणेश मूर्तींचे विसर्जन काळसे तर येथील याच जेटीवरून कर्ली नदीमध्ये विसर्जन केले जाते. त्यामुळे जेटी सोबतच गणेश विसर्जन घाट म्हणूनही या जेटीचा वापर केला जातो. म्हणूनचं काळसे वासियांच्या मागणी नुसार या जेटी साठी जिल्हा नियोजन मधून 50 लाख रुपये निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याबद्दलं काळसे ग्रामस्थांनी यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांचे आभार मानले.
यावेळी मार्गदर्शन करताना दत्ता सामंत यांनी सांगितले कीं जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे हे दोन्ही भाऊ जिल्ह्यातील जनतेसाठी अत्यंत चांगले काम करत आहेत. यांच्या आणि खासदार नारायण राणे साहेबांच्या माध्यमातून जिल्ह्यात पुन्हा विकास कामाना गती मिळालेली आहे. या काळसे जेटीच काम हे जिल्ह्यात आदर्श मॉडेल म्हणून ओळखलं जाईल असं दर्जेदार काम केलं जाईलं. येणाऱ्या गणेश चतुर्थीवेळी गणेशभक्तांचे आशीर्वाद मिळतील यातच या कामाच यश आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आता जास्तीत जास्त तरुणांनी समाजकारणात, राजकारणात नेतृत्व करून पुढाकार घेण्याची गरज आहे. असे सांगून काळसे गावाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र परब यांनी केले व आभार केशव सावंत यांनी मानले.
















