लहान वयात मोठी भरारी; सानवी कासलेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे वाटचाल

सिंधू कन्येची जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन खेळात चमकदार कामगिरी

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : केवळ वयाच्या ११ व्या वर्षी सानवी नेहा निलेश कासले हिने जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन या खेळात उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे. ७वी ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप आणि २री आशियाई ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप या स्पर्धेच्या निवड चाचणीत ती सहभागी झाली होती. हि निवड चाचणी १८ आणि १९ एप्रिल २०२६ रोजी चेन्नई मधील तमिळनाडू येथील हॉल ऑफ जिमनॅस्टिक येथे पार पडली. या स्पर्धेत अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये सानवीने आपल्या उत्कृष्ट कौशल्याने लक्ष वेधून घेतले व चौथे स्थान पटकावले. आणि यापुढे चायना येथील हॉंकॉंग येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई जिमनॅस्टिक ट्रॅम्पोलिन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ती सहभागी होणार आहे. सानवी हि देवगड तालुक्यातील मुणगे बौध्द वाडी गावची तसेच निलेश सदानंद कासले व नेहा कासले यांची कन्या असून मुंबईतील वडाळा कोरबा मिठागर येथील आनंदवाडी येथे राहत असून लहान वयातच खेळाप्रती असलेली आवड, मेहनत, चिकाटी आणि तिच्या आई वडिलांच्या प्रयत्नांमुळे तिने ही यशाची पायरी गाठली आहे. तिच्या या यशासाठी तिचे अजय जिम क्लब अकॅडमीचे सर्वेसर्वा अजय म्हापूसकर सर, व तिचे प्रशिक्षक गणेश चाळके सर आणि शुभम तांबे सर यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. तिच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, शाळेतील शिक्षिका, आणि स्थानिक नागरिकांकडून तिचे कौतुक होत असून भविष्यात ती आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!