वागदे ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू; सर्व दाखले आता गावातच उपलब्ध

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित करण्यात आले असून ग्रामस्थांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे. या सेवा केंद्रामार्फत उत्पन्न दाखला, जातीचा दाखला तसेच कचेरीतून मिळणारे सर्व प्रकारचे शासकीय दाखले आता थेट ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध होणार आहेत. यामुळे नागरिकांना लांबच्या कणकवली येथे जाऊन पायपीट करण्याची गरज उरणार नाही. वेळ आणि खर्चाची बचत होणार असून गावातच जलद व सोयीस्कर सेवा मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने नागरिकांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!