नाधवडे येथे श्री चवाटी माता-विठ्ठला देवी मंदिर जीर्णोद्धार सोहळा

३० एप्रिल ते ३ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे गावठाण येथील श्री चवाटी माता आणि श्री विठ्ठला देवी माता मंदिर जीर्णोद्धार निमित्त गुरुवार दिनांक ३० एप्रिल ते रविवार दिनांक ३ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार दि.३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता नूतन मुर्त्यांची भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. शुक्रवार दि.१ मे २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता कलशांची स्थापना,यज्ञ, ग्रामस्थांचे नवसविधी ठेवून आमंत्रण संकल्प, गणपती पूजन,पुण्याहवाचन,मातृका पूजन,नांदी श्राद्ध,आचार्यवरण,स्थापत्य विधान,यज्ञारंभ,कलशस्थापना,आवाहित देवाहित देवांचे ग्रहशांती केले जाईल.रात्री ८ वा.सुस्वर भजने होतील.
शनिवार दि.२ मे रोजी स.८ वा.वास्तुग्रह या देवतांची स्थापना, पूजन व हवन,मुख्य देवतांचे प्रतिष्ठा होम,वास्तुहोम व ग्रहहोम.स.९.३० ते १०.३० कलशासह प्रदक्षिणा.रात्रौ १० वा.मनोरंजन कार्यक्रम.

रविवार दि.३ मे रोजी स.८.३० ते १०.३० कलशारोहण व प्रतिष्ठा, प्राणप्रतिष्ठा सोहळा.आरती,सर्व देवतांचा मंत्रोपचाराने होम,नेत्रोत्मिलन,स.१०.३० वा.देवांची प्राणप्रतिष्ठा, देवतांना तांब्या धातुचा कलश प्राणप्रतिष्ठा, मुख्य देवतांची महापुजा,पुर्णाहुती अभिषेक,महाअभिषेक, नैवेद्य, महाआरती, प्रार्थना, प्रसाद व महाप्रसाद.रात्रौ १० वा.भक्ती ते ताल हा देवधून सुस्वर मैफल कार्यक्रम होईल.सर्वांनी उपस्थित राहून धार्मिकसह सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन १२/५ मानकरी,सेवेकरी,समस्त ग्रामस्थ व नाधवडे ग्रामविकास मंडळ मुंबई यांनी केले आहे.

error: Content is protected !!