कलमठ ग्रामपंचायतीतर्फे ‘समर कॅम्प’ आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कलमठ ग्रामपंचायत, ता. कणकवली यांच्यातर्फे दि. 22 व 23 एप्रिल 2026 रोजी ‘किड्स समर कॅम्प 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. माती नेचर रिसॉर्ट, जानवली येथे हा दोन दिवसीय निवासी शिबिर संपन्न होणार आहे.

या कॅम्पचे उद्घाटन जि.प. सिंधुदुर्ग महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य सौ. सुप्रिया संदीप मेस्री , पंस सदस्य गुरुनाथ वर्देकर यांच्या हस्ते होणार आहे.

कॅम्पमध्ये मुलांसाठी योगासन मार्गदर्शन, नृत्य प्रशिक्षण, पेपर क्राफ्ट, रंगोत्सव, फनी गेम्स, कळसूत्री बाहुल्यांचे सादरीकरण व अवकाश दर्शन असे विविध उपक्रम ठेवण्यात आले आहेत.

सरपंच संदीप मेस्री, उपसरपंच दिनेश गोडणकर व ग्रामपंचायत अधिकारी प्रविण कडतनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.
अधिक माहितीसाठी अनूप वारंग (98223 61036) किंवा नितीन पवार (94049 21777) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणि रंगोत्सवाची धमाल

योगा प्रशिक्षक प्रमोद लिमये, एस.के. डान्स अकॅडमी, चेतन गांगावणे यांचे बाहुल्यांचे सादरीकरण आणि पुण्याचे वेद पेडेकर यांचे अवकाश दर्शन ही या कॅम्पची खास वैशिष्ट्ये आहेत.
रुपाली कदम अर्चना गावडे यांचेक्राफ्ट आणि व्यक्तिमत्त्व विकास यावर मार्गदर्शन होणार आहे. कलमठ गावातील इयत्ता चौथी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले आहे

error: Content is protected !!