नाशिकमध्ये युथ लीडरशिप कोर्सचा उत्साही शुभारंभ; पहिला दिवस यशस्वी

नाशिक (प्रतिनिधी) : अनुभव शिक्षा केंद्र मुंबई कोकण युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सचा पहिला दिवस उत्साहात संपन्न नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या अनुभव शिक्षा केंद्र मुंबई कोकण युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्सचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कोर्सची सुरुवात सर्व सहभागी तरुण-तरुणींच्या हस्ते उद्घाटन करून करण्यात आली. यावेळी विभागीय समन्वयक साथी पूजा गटे, आसमा अन्सारी, जिल्हा प्रशिक्षक दरक्षा शेख, संध्या म्हेत्रे आणि सहदेव पाटकर उपस्थित होते.

हा कोर्स १९ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत नाशिक येथे आयोजित करण्यात आला असून, उद्घाटन सत्रानंतर सहभागींची ओळख करून देण्यात आली. तसेच युवा आणि अनुभव शिक्षा केंद्राच्या कार्याची माहिती देण्यात आली. पहिल्या दिवसाचे सत्र विभागीय समन्वयक साथी दिपक देवरे यांनी घेतले. त्यांनी ‘युवक ओळख आणि समाज’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्तीची स्वतःची ओळख आणि समाजाने दिलेली ओळख याविषयी सखोल चर्चा केली. या कोर्समध्ये पुढील दिवसांमध्ये कल्पक विचार, संविधान, पर्यावरण, लिंगाधारित समानता, प्रशासकीय यंत्रणा तसेच अभ्यास दौरा यांसारख्या विविध विषयांवर सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.

error: Content is protected !!