सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन

25 एप्रिल रोजी गोपुरी आश्रम सभागृहात होणार महिला मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाच्या वतीने रविवार 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता महिला मेळाव्याचे आयोजन गोपुरी आश्रम वागदे येथील नाईक पेट्रोल पंपामागील सभागृहात करण्यात आले आहे. सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघाचे अध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या महिला मेळाव्यास समाज कल्याण सभापती रुहिता तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून अरविंद वळंजू यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. महिलांचे आरोग्य, उद्योजकतेतून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, बौद्ध स्त्रिया आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!