तळेरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके संपादन करुन ऑलिंपिक, आशियाई व कॉमन वेल्थ इ. स्पर्धांमध्ये भारताचे व राज्याचे नाव उज्वल करणे या उद्देशाने मिशन लक्ष्यवेध ही महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हयात जिल्हास्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्राकरिता सद्यस्थितीत अॅथलेटिक्स या खेळाचे अनिवासी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. क्रीडा प्रतिभा विकास प्रशिक्षण केद्राकरिता खेळाडूंची निवड करण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्हयात जिल्हास्तर खेळनिहाय चाचण्यांचे आयोजन दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजता जिल्हा क्रीडा संकुल, सिधुदुर्गनगरी ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात येणार आहे. जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी होणाऱ्या निवडचाचणीत सहभाग घेण्यात यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी सदर लिंकवरती आपली नोंदणी करावी.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSddaNtflwENEHm5i2_l-
tedKlygmmL49ZARzsH204aeXwBEkg/viewform?usp=publish-editor
“मिशन लक्षवेध” या योजनेच्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरावरील ॲथलेटिक्स (मैदानी) क्रीडा निपुणता केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन












