मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे शिवसेना दैनंदिनी 2023 चे प्रकाशन करण्यात आले. या शिवसेना दैनंदिनीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे व इतर सर्व शिवसेना नेते, उपनेते, प्रवक्ते सचिव, खासदार, आमदार, पुरुष व महिला विभाग प्रमुख शिवसेनेस सलग्न असलेल्या विविध संघटना,महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख नंबर तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त असलेली बहुमोल माहिती यात अंतर्भूत आहे.
हया शिवसेना दैनंदिनी 2023 ची निर्मिती जी. एस्. परब व साकेत पवार यांनी केली असून ही शिवसेना दैनंदिनी 2023 दिनांक 8 मे पासून शिवसेना भवन, दादर येथे उपलब्ध होईल. यावेळी आमदार श्री. रविंद्र वायकर, सचिव श्री. मिलिंद नार्वेकर, जनसंपर्क प्रमुख श्री. हर्षल प्रधान आणि शिवसेना दैनंदिनी निर्मिती प्रमुख जी. एस्. परब व साकेत पवार आदी उपस्थित होते.