सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्यासह जिल्ह्यातील सर्वच किल्ल्यांच्या संवर्धनकरिता विशेष प्रयत्न करणार – आमदार रविंद्र फाटक

आ.फाटक यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन केली पाहणी

मुख्यमंत्री शिंदे यांना दिले निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराची स्थापना करण्यासाठी निवडलेला जिल्हा व त्यांनी स्वतः उभारलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने या दोन्ही किल्ल्यांच्या संवर्धनासाठी व डागडुजीकरिता केंद्र सरकारकडून भरीव सहकार्य व्हावे यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती करून जिल्ह्यातील इतरही सर्वच किल्ल्यांच्यासंवर्धनासाठी मी शिवसेनेच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना विजयदुर्ग पुरळ विभागात कार्यकर्ता बैठकीसाठी गेले असता सर्वप्रथम आ.फाटक यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझड झालेल्या भागाची पाहणी करुन विजयदुर्ग चे सरपंच व स्थानिक ग्रामस्थांकडून येथील समस्यांची संपूर्ण माहिती घेतली.किल्ल्याच्या समुद्राकडील मागील बाजूच्या तटबंदीस मोठा तडा गेल्याने भविष्यात तटबंदी कोसळून पाणी आत शिरून किल्ल्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते म्हणून शिवरायांच्या शौर्याचा व आरमाराचा जिवंत इतिहास जपणारया विजयदुर्ग व सिंधुदुर्ग हे दोन प्रमुख ऐतिहासिक किल्ले व जिल्ह्यातील इतरही सर्वच किल्ले इतिहास जमा होण्यापुर्वी सर्व किल्ल्यांचे संवर्धन होऊन त्यांची जपणूक व्हावी या मागणीचे निवेदन मा.मुख्यमंत्री व उपमुखमंत्री यांना देऊन याविषयी गांभीर्यानी लक्ष घालावे अशी विनंती करणार असल्याची माहिती आमदार फाटक यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाप्रमुख संजय आग्रे,विधानसभा संघटक संदेश पटेल,ठाण्याचे नगरसेवक दिपक वेतकर,विजयदुर्गचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या सहित स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!