नगराध्यक्ष नलावडे आणि टीम ने केले उत्कृष्ट काम

पालकमंत्र्यांनी केले कौतुक

पालकमंत्र्यांच्या हस्ते कणकवलीत विकासकामांचे भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कणकवलीतील जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता तयार करणे 92 लाख, रवळनाथ मंदिर ते सुतारवाडी रस्ता तयार करणे 75 लाख व सोनगेवाडी गार्डन नूतनीकरण करणे 38 लाख 85 हजार या कामाची भूमिपूजन बांधकाम मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे यांच्यासह उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत, भाई सावंत, नगरसेवक रुपेश नार्वेकर, शिशिर परुळेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, रवींद्र गायकवाड, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, उर्वी जाधव, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा गांगण, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी नगरसेवक बंडू गांगण, महेश सावंत, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, किशोर राणे, जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, प्राची कर्पे, संजना सदडेकर, सरपंच संदीप मेस्त्री, बाळा सावंत, बाळा पाटील, नामदेव जाधव, आशिष पोयेकर, मनोज धुमाळे, ध्वजा उचले, सुमित कुबल, रुजुता ताम्हाणेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!