थरारक ! भरदिवसा झालेल्या गोळीबाराने आचरा हादरले…!

गोळीबारानंतर झालेल्या चॉपर हल्ल्यात युवक जखमी

आचरा ( विवेक परब ) आचरा येथे बंधाऱ्याच्या कामाला अटकावं करणाऱ्याची सुपारी देण्याच्या संशयावरून तौकिर जुम्मंन शेख रा. आचरा याच्याशी आचरा डोंगरेवाडी पारवाडी युवकांमध्ये आचरा तिठ्यावर झालेल्या बाचाबाची नंतर काही वेळाने तौकीर व संशयित दोघांनी दुचाकी वरून येत आचरा देवगड रोडवर रामेश्वर मंदिर फाट्यानंजिक बाचाबाची सहभागी झालेल्या युवकांच्या तवेरा गाडीसमोर दुचाकी आडवी घालून फायरिंग करत गाडीतील युवकांवर चॉपर ने हल्ला केला. या हल्ल्यात एक युवक जखमी झाला असून ही घटना आज गुरुवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडली. घटना कळताच जमा झालेल्या जमावाने त्यांना अडवत पोलिसांना बोलून त्यांच्या ताब्यात दिले यात सहभागी आणखी दोघांनी पलायन केले. असल्याचे प्रत्यक्षदर्शीनीं सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर आचरा तिठ्यावर गर्दी जमा झाली होती. घटनेचे गंभीर्य ओळखून आतरिक्त पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे आचरा आरोग्य केंद्राकडे दाखल झाले होते. घटनास्थळी चार पुंगळ्या आढळून आल्या होत्या.

बचाबाचीचे पर्यवसान गोळीबारात

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार आचरा तिठानजीक येथे सायंकाळी चारच्या सुमारास तौकिर या युवकांने आपणास मारण्याची सुपारी घेतली आहे या संशयावरून सदर युवकांस आचरा डोंगरेवाडी, पारवाडी येथील युवकांनी जाब विचारला यावेळी तेथील युवक व तौकीर मध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यानंतर तो निघून गेला काही वेळानंतर आणखी सहकारी घेऊन येत बाचाबाची करणाऱ्या युवकांच्या तवेरा गाडीसमोरं दुचाकी आडवी घालून जाब विचारत फायरिंग केली त्यानंतर गाडीतील गौरव पेडणेकर या युवकाच्या डाव्या हातावर वार करत दुचाकी वरून पळून जात असताना त्यांची गाडी स्लिप झाल्याने गाडी तिकडेच टाकत संशयित पळून जाऊ लागले भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या घटनेने यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शीनीं त्यांचा पाठलाग करत दोघाना पकडले तर दोघेजण पळून गेल्याचे बोलले जात होते. यात प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार फायरिंग करणारा शुभम जुवाटकर व दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर यांना जमवाने पोलीस येई पर्यंत पकडून ठेवले होते मिळालेल्या माहितीनुसार शुभम जुवाटकर हा मालवण दांडी तर दुचाकी चालवणारा प्रतिक हडकर हा चिंदर येथील असल्याचे समजते.

जमवा बरोबर झालेल्या झटापटीत जुवाटकर याच्या कडील रिव्हावाल्वर व चॉपर रस्त्यावर पडलेले होते. व संशयितला पकडून ठेवलेल्या ठिकाणी पाकिट व चिलीम पडलेली होती त्या वस्तू फायरिंग करणारा जुवाटकर याने फेकल्या असल्याचे ग्रामस्थ बोलत होते. आचरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे व पोलीस अक्षय धेंडे, मनोज पुजारे, बाळू कांबळे दाखल झाले होते आचरा पोलिसांनी पकडलेल्या दोघांना ताब्यात घेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत पुढील कारवाई सुरु केली होती.

घटनेनंतर आचरा ग्रामस्थ आक्रमक

जमा झालेले ग्रामस्थ आक्रमक झाले होते झालेल्या घटनेमुळे गावाची बदनामी झाली असून या घटनेत गुंतलेले संशयित हे चरस गांजाच्या व्यवसायात गुंतलेले असून तरुण पिढी बरबाद करत आहेत पिस्तूल आणि फायरिंग एवढ्याच घटनेची चौकशी न करता चरस गांजाचे रँकेट चालवणाऱ्या या टोळीच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी केली या फायरिंगच्या घटनेमागे आणखीन काहीचा हात असणाऱ्यांना ताब्यात घेण्याची मागणी उपस्थित धोंडी चिंदरकर, जेरोन फर्नांडिस, राजन गावकर, महेश राणे, बाबू कदम, अभिजित सावंत, मंदार सरजोशी, प्रशांत गावकर व बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते. वाढत्या गर्दीला काबूत आणण्यासाठी पोलीसांना आक्रमक पवित्रा घ्यावा लागला होता. पुढील तपास पोलिस निरीक्षक शंकर कोरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!