सेवानिवृत्त बौद्ध दि संघामार्फत महिला मेळावा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गाने समृद्ध आहे तसा तो विविधतेनेही समृद्ध आहे पण दुर्दैवाने तो येथील मागासलेपणातही कमी नाही. या जिल्ह्याची समृद्धी निर्माण करायची असेल तर येथील तरुण आणि महिलांनी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन स्वयंरोजगाराची कास धरणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक सुषमा साखरे यांनी येथे केले. सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग च्या वतीने शनिवारी वागदे येथील गोपुरी सभागृहात आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत कदम हे होते. तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी तथा तथागत नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू हे होते यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण च्या सभापती रोहिता तांबे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण या विषयावर श्रीमती साखरे बोलताना पुढे म्हणाल्या की समाजाची प्रगती ही महिलावरच अवलंबून असून महिलांनीच पुढे येऊन स्वतःच्या अपेक्षा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणे महत्त्वाचे असल्याने आपण कामगार न बनता मालक बना असा सल्ला त्यांनी देऊन शासनाच्या विविध स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती दिली. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना सभापती तांबे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानेच आपणाला ही पदे मिळत असल्याचे त्यांनी मान्य करून या संविधानाचे महत्त्व त्यांनी विशद केले. हे संविधान आणि बाबासाहेबांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून महिला वर्गाने जागृतीचा हा विस्तव तेवत ठेवण्यासाठी पुढे येणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. समाजातील रूढी परंपरा या सोडून समाजाने परिवर्तनाच्या प्रवाहात यावे असे आवाहन केले व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे असे आवाहन केले.

यावेळी उद्योजक मुकुल कुलकर्णी यांनी पर्यावरणाचा ऱ्हास ज्या प्लास्टिक मुळे होतो ते नष्ट करून पर्यावरणाला पूरक कसे उद्योग निर्माण करता येतील हे स्पष्ट केले. पर्यावरण पूरक उद्योगात सिंधुदुर्ग हा जगाचा हब बनेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. व बचत गटांनी पुढे येऊन या व्यवसायात पुढे यावे असे आवाहन केले आपण अशा बचत गटांना आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली. आरोग्याबाबत मार्गदर्शन करताना डॉ सराटे यांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी काय खावे काय खाऊ नये हे सांगून चायनीज बर्गर आणि देशी-विदेशी फळे खाण्यापेक्षा आपल्या कोकणातीलच टिकणारे हंगामानुसार फळे भाज्या खा व निरोगी रहा असा सल्ला दिला आणि त्यातूनच मेंटली फिजिकल स्ट्राँग रहा असा सल्ला दिला आजार झाल्यानंतर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये याचीच काळजी घेणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट केले. सोन्या che दागिने हे श्रीमंती नसून सदृढ शरीर ही तुमची खरी समृद्धी आहे हे त्याने स्पष्ट केले. उद्घाटक म्हणून बोलताना अरविंद वळंजु यांनी सेवानिवृत्त संघटना स्थापन करून गेल्या पाच वर्षात समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणकोणत्या योजना उपक्रम आपण राबवलहेहे सांगून जिल्ह्यात पहिली पतपेढी या संस्थेने निर्माण केली मात्र समाजा कडून आवश्यक तेवढे सहकार्य मिळत नाही याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला सुषमा हरकुळकर यांनी बौद्ध स्त्रिया आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करताना 22 प्रतिज्ञा याच मधून च वैज्ञानिक दृष्टिकोन असा दिसून येतो हे स्पष्ट केले. अनित्य वाद समजून घेऊन विज्ञानवादी बना असे सांगून विश्वाची निर्मिती कशी झाली हे त्यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष पदावरून बोलताना सूर्यकांत कदम यांनी पंचशील आचरणात आणा म्हणजे तुम्ही खरे बौद्ध बनाल अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेब आंबेडकर भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचे पूजन करून व प्रास्ताविकेचे वाचन करून करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रद्धा कदम यांनी केले तर स्वागत मिलिंद सर पे व मान्यवरांनी केले कार्यक्रमाची सुरुवात ममता जाधव यांच्या भीम गीताने करण्यात आली .तर शेवटी आभार स्वाती कदम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता जाधव यांनी केले या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!