नाटळ (प्रतिनिधी) : नाटळ बौद्ध विकास संघ नाटळ, शाखा मुंबई (रजि) च्या माध्यमातून तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव दिनांक ३०/०४/२०२६ ते ०१/०५/२०२६ रोजी साजरा करण्यात येत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 1 मे रोजी ‘युथ क्रिएशन नाटळ प्रस्तुत’ ऑर्केस्ट्रा स्वरझंकार सादर होणार आहे तर पहिल्या दिवशी सायंकाळी होम मिनिस्टर अर्थात् पैठणी रमाईची आणि सकाळी ठीक ११.०० वाजता वक्तृत्व स्पर्धां आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे:
गट क्रमांक ०१- पहिली ते चौथी
विषय – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण
गट क्रमांक ०२- पाचवी ते सातवी
विषय – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार
गट क्रमांक ०३- आठवी ते दहावी
विषय – माझे प्रेरणास्थान : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येथे संपर्क:
आयु. चंद्रकांत तांबे 9420210894, 9699426025
प्रीतम तांबे – 9322011704
जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.











