उपअभियंता शेडेकर चिखलफेकप्रकरणी मंत्री नितेश राणेंसह सर्व आरोपी निर्दोष

सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी 1 महिना कारावास, 1 लाख दंड

शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार

ओरोस (प्रतिनिधी) : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिना कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी सोमवारी हा निकाल दिला. कणकवली येथे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंत्यावर चिखल फेक प्रकरणी न्यायालयाने निकाल देताना चिखल फेक प्रकरणी निर्दोष ठरविताना शांततेचा भंग करणे आणि त्यासाठी अन्य जणांना प्रवृत्त करणे प्रकरणी दोषी ठरविले आहे. मात्र, या प्रकरणातील अन्य २९ जणांना निर्दोष ठरविले आहे.

मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या पाहणीसाठी कणकवली विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आ नितेश राणे यांनी महामार्ग अभियंता प्रकाश शेडेकर यांना बोलावून घेतले होते. आमदारांनी बोलावल्याने पाहणीसाठी कणकवली येथील गडनदी पुलावर दाखल झालेल्या शेडेकर यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला होता. तसेच त्यांना बांधून ठेवले व त्यानंतर चिखलातून चालत नेले होते. 4 जुलै 2019 रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी प्रकाश शेडेकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारी नुसार नितेश राणे यांच्यासह अन्य 29 अशा एकूण 30 संशयित आरोपींवर भा. द.वि कलम 353, 332, 342, 324, 147, 143, 148, 149, 323, 504, 506, 109,120 (ब) सह सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

error: Content is protected !!