वैभववाडी ग्रामीण रुग्णालय डाॅक्टर मारहाण व ताेडफाेडप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर वैभव मोरे यांना झालेल्या मारहाण व रुग्णालय तोडफोड प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आरोपी संदीप तानवडे व गणपत तानवडे या दोघांवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

कोकिसरे येथील संदीप तानवडे यांचा मुलगा शिवांश संदीप तानवडे वय वर्ष नव हा गेले बरेच दिवस आजारी होता. त्याच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. बेंगलोर येथे ही त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.

दिनांक २६ एप्रिल रोजी शिवांशयाला सकाळपासूनच श्वसनाचा त्रास होत होता. त्याला श्वास घेण्यात अडथळा येत होता.सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांना या संदर्भात माहिती देण्यात आली. डॉक्टर वैभव मोरे व त्यांचे सहकारी पेशंट येणार म्हणून वाट पाहत होते. पेशंट ग्रामीण रुग्णालयात आणला.डॉक्टरांनी त्याला कृत्रिम रित्या ऑक्सिजन दिला. मात्र त्याची हालचाल होत नव्हती. त्यानंतर सदर पेशंटचा डॉक्टरांनी तात्काळ ईसीजी काढला. त्यामध्येही त्यांना कोणतीच हालचाल दिसली नाही. त्यानंतर डॉक्टर वैभव मोरे यांनी शिवांशाचे वडील संदीप तानवडे यांना पेशंटचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे ऐकताच संदीप तानवडे यांना प्रचंड राग आला व त्यांनी डॉक्टर मोरे यांच्या कानाखाली लगावली व घाणेरड्या शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.

रुग्णालयात अजून कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून या घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना देण्यात आली. वैभववाडी पोलीस निरीक्षक यामनोज सोनवलकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.त्या ठिकाणी संदीप तानावडे व त्याचे वडील गणपत तानवडे हे संबंधित डॉक्टरांना शिवीगाळ करून अंगावरून धावून जात होते. डॉक्टर मोरे यांनी वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारी नुसार
वैभववाडी पोलिसांनी याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद केला आहे व घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

error: Content is protected !!