व्यापारी श्रीकांत (बंडू) पारकर यांचे निधन…!

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील विद्यानगर येथील रहिवासी व ज्येष्ठ व्यापारी श्रीकांत उर्फ बंडू विश्वनाथ पारकर (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बाजारपेठेतील महापुरुष मंदिर शेजारी त्यांचे चहा व अगरबत्तीचे दुकान होते. मनमिळावू स्वभाव, हसमुख चेहरा आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याचे संबंध यामुळे ते परिसरात सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, सून, विवाहित बहिणी, भाऊ, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुथूट बँकेचे कर्मचारी हर्षद पारकर यांचे ते वडील तर ज्येष्ठ व्यापारी बापू पारकर, तालुका व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष राजन पारकर आणि उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते संजय पारकर, सुशील पारकर यांचे ते चुलत बंधू होत. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी कणकवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!