शेटकरवाडी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका; दुरुस्तीची मागणी

बांदा (प्रतिनिधी) : शेटकरवाडी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः पावसाळा तोंडावर असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर भाजपा बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रमोद मोडक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावर प्रतिसाद देताना कनिष्ठ अभियंता प्रमोद मोडक यांनी संबंधित कंत्राटदारासह तात्काळ स्थळ पाहणी करून पावसाळ्यापूर्वी सर्व खड्डे भरून रस्ता दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, सदर रस्ता वर्षभरापूर्वीच हॉट मिक्स पद्धतीने तयार करण्यात आला होता. मात्र, अवघ्या वर्षाच्या आतच रस्त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

error: Content is protected !!