चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पोईप गावामधील जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा पोईप नं. १ मधील विद्यार्थ्यांनी एसटीएस (STS) , बिडीएस (BDS), मंथन, डिसिए (DCA) परिक्षेत भरघोस यश संपादित केले.
१८ जानेवारी २०२६ ला STS परीक्षेसाठी शाळेतील एकूण १३ विद्यार्थी बसले होते. त्यातील इयत्ता ३ री तील कु. जान्हवी महेंद्र पालव – सिल्व्हर मेडल, कु. तन्वी गणेश माधव – ब्राँझ मेडल. ४ थी मधील कु. धारेश्वर श्रीधर नाईक – गोल्ड मेडल मिळविले. बाकी सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
११ जानेवारी २०२६ रोजी BDS परीक्षेसाठी ९ विद्यार्थी बसलेले चांगल्या गुणांनी ने उत्तीर्ण झाले. १ फेब्रुवारी २०२६ रोजी मंथन परीक्षेसाठी बसलेली ४ थी मधील कु. हार्दिका राजाराम पाटकर – A ग्रेड मिळवून उत्तीर्ण झाली.
२३ मार्च रोजी DCA परीक्षेमध्ये २ विद्यार्थी बसले होते.चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. ४ थी मधील कु. हार्दिका राजाराम पाटकर – गोल्ड मेडल मिळवून उत्तीर्ण झाली. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक श्री. घाडीगावकर, शिक्षिका श्रीम. पांचाळ, श्रीम. परब, श्रीम. माधव यांचे मार्गदर्शन लाभले.











