प्रमोद जठार पुन्हा होणार आमदार

 विधानपरिषदसाठी भाजपाकडून पहिली पसंती

कणकवली (प्रतिनिधी) : विधान परिषदेसाठी भाजपच्या पाच उमेदवारांची नावे जाहीर करण्यता आली आहेत. भाजपने आपल्या यादीत माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे आणि प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संभाव्य उमेदवारांमध्ये कोकणातून प्रमोद जठार यांना संधी दिल्याने राणे समर्थकांसह भाजपच्या निष्ठावंत गोटातून आनंद व्यक्त करण्यात आला.

श्री. जठार हे सन २००९ मध्ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. तर सन २०१४ च्या निवडणुकीत विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून पराभूत झाले होते. श्री. जठार हे आमदार असताना त्यांनी आनंदवाडी बंदर, वैभववाडी बस स्थानक तसेच इतर अनेक विकास कामे मार्गी लावली होती तर नानार येथे रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता पुढील सहा वर्षाच्या कार्यकाळात कोकणातील अनेक वेद विकास प्रकल्प मार्गी लावणे हेच आपले ध्येय असणार असल्याची ग्वाही, श्री. जठार यांनी दिली तसेच विधान परिषदेची संधी दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!