प्रजासत्ताकदिनी सकाळी 6 वाजता सर्व ग्रा. पं. क्षेत्रात स्वच्छता कार्यक्रम

ओरोस (प्रतिनिधी) : 73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत 26 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाच्या सुचनांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात सकाळी 6 वाजता परिसर स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी दिली आहे.

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या कडील परिपत्रकव्दारे राज्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वाजता स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत कळविण्यात आले आहे. यास अनुसरुन जिल्ह्यातील सर्व ग्रामपचायत कार्यक्षेत्रात 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 6 वा. स्वच्छता कार्यक्रम घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. तरी जिल्हावासियांनी या कार्यक्रमांत सहभाग घ्यावा असे आवाहन प्रजित नायर यांनी केले आहे.

error: Content is protected !!