शासकीय कामात अडथळा आणणे भोवले ; वृद्ध आईसह मुलास एक वर्ष सश्रम जेलसह 2 हजार दंड

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रतिभा प्रल्हाद गोळवणकर (68) आणि अमोल प्रल्हाद गोळवणकर (38)रा. कुडाळ, आई आणि मुलाला दोषी धरून तदर्थ जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूर्यकांत इंदलकर यांनी त्यांना एक वर्ष कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारीअभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले. कुडाळ एस. एन. देसाई चौक येथील एमआयडीसीच्या अखत्यारीतील रस्त्याच्याकडेला गटार खोदाईचे काम सुरू असताना प्रतिभा गोळवणकर यांनी गटारात बसून काम करण्यास सरकारी यंत्रणेलाअटकाव केला होता. तर अमोल याने अटकाव करीत स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. 2जुलै 2019 रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर सरकारी कामात अडथळा प्रकरणी तसेच प्रल्हाद याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. या खटल्याच्या सुनावणीत प्रतिभा हिला 1 वर्ष साधा कारावास आणि 2000 रुपये दंड तर अमोल याला 1 वर्ष सश्रम करावास आणि 3000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. एम.आय.डी.सी चे तत्कालीन व्यवस्थापक हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी याबाबत तक्रार दिली होती. तर तत्कालीन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शीतला पाटील यांनी तपास केला होता.

error: Content is protected !!