जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे येथे होणार पोलिस पाटील यांचे साठी जादूटोणा कायद्याचे प्रशिक्षण

विजय चौकेकर यांनी निवेदनाद्वारे केली होती मागणी

सर्व पोलिस ठाणे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन होणार

ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने जादूटोणा विरोधी कायदा २०१३ रोजी संमत केला. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समिती ( PIMC ) मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली स्थापन ही झाली. या समितीने जिल्ह्यात विविध ठिकाणी जादूटोणा विरोधी कायदाचे प्रात्यक्षिकासह व्याख्याने आयोजित करावयाची आहेत. या समितीमध्ये जिल्हा पोलिस अधिक्षक हे सदस्य असल्याने त्यांच्या अधिनस्त येणाऱ्या सर्व कर्मचारी यांना हे प्रशिक्षण आयोजित करणे आवश्यक असते. त्यामुळे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी त्यांची नुकतीच भेट घेतली होती व निवेदन देऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस पाटील यांना जादूटोणा विरोधी कायदाचे प्रशिक्षण आयोजित करावे .अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा व या कक्षामध्ये पोलिस पाटील यांचेकडून पोलिस ठाणे हद्दित जादूटोणा करणाऱ्यांची माहिती संकलित करावी अशी लेखी मागणी केली होती .या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांनी सर्व पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक तसेच प्रभारी अधिकारी यांना नुकतेच पत्र काढून आप आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलिस पाटील यांची जादूटोणा विरोधी कायदा २०१३ ची अंमलबजाणी व जनजागृती करण्यासाठी एक दिवसीय बैठक आयोजित करावी . या बैठकीला सर्व पोलिस पाटील उपस्थित राहतील याची अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. या बैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा संघटक विजय चौकेकर व अध्यक्ष राजीव बिले अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदूर्ग यांना आमंत्रित करावे . दिनांक व वेळ नमूद करून त्यांना तसे विनंती पत्र द्यावे . तसेच सदर बैठकीचा दिनांक व वेळ जिल्हा अधिक्षक कार्यालयाला सत्वर कळवावे असे ही लेखी कळविले आहे.

आपल्या निवेदनात शासन आदेशाप्रमाणे सर्व पोलिस ठाणे येथे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा व त्या कक्षामध्ये जादूटोणा करणाऱ्यांची माहिती संकलित करावी अशीही मागणी विजय चौकेकर यांनी केली होती. त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देताना या पत्रामध्ये शासन आदेशानुसार सर्व पोलिस ठाण्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करावा व या कक्षामध्ये पोलिस पाटील यांचेकडून पोलिस ठाणे हद्दित जादूटोणा करणाऱ्यांची माहिती संकलित करावी असेही सर्व पोलिस निरीक्षक व प्रभारी अधिकारी यांना कळविले आहे. त्यामुळे आता जिह्यातील सर्व पोलिस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन होणार असून त्या कक्षात त्या त्या हद्दित जादूटोणा करणाऱ्यांची माहिती ही संकलित केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यात सर्व सामान्य जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसविणाऱ्या भोंदू बाबांवर वचक बसविण्यासाठी मदतच होणार आहे. मोहन दड़िकर जिल्हा अधिक्षक यांनी दिलेल्या निवेदनावर तात्काळ कार्यवाही करून सर्व पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक यांना आदेश काढल्याबद्दल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष राजिव बिले, संघटक विजय चौकेकर व जिल्हा सचिव अजित कानशिडे यांनी त्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!