संयुक्त जयंती महोत्सवा निम्मित तरंदळे बौद्धवाडी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा- आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे तथागत भगवान गौतम बुद्ध व बोधिसत्व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव शनिवार दिनांक 13 मे ते रविवार दिनांक 14 मे रोजी तरंदळे बौद्धवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे शनिवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 8:00 वाजता पंचशील ध्वजारोहण व धम्मवंदना
स.8:15 बुद्ध पूजापाठ
9:00 वा लहान मुलांचे क्रीडा स्पर्धा
11:00 वा शालेय लहान गट वकृत्व स्पर्धा
दु. 2:00 वा महिलांसाठी संगीत खुर्ची सायं. 7:30 वा बक्षीस वितरण कार्यक्रम
रात्रौ.9:30 वा धम्मदीप हा मानवतेचा आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे बुद्ध भीम गीते व सांस्कृतिक कार्यक्रम रात्रौ.10:30 वा आदर्श बौद्ध विकासनिर्मित लेखक डॉ. विठ्ठल गाड लिखित किशोर कदम दिग्दर्शित मालवणी तुफान विनोदी,सामाजिक,कौटुंबिक हृदयस्पर्शी एकांकिका “आम्ही मालवणी”
रविवार दिनांक 14 मे 2019
स.8:00 ते दु.12:00 लहान मुलांच्या विविध स्पर्धा
दु.3:00 ते 4:00महिलांसाठी विविध कार्यक्रम
सायं. 7:00 वा बुद्ध पूजापाठ
सायं.7:30 वा अभिवादन सभा मान्यवरांचे स्वागत व सत्कार समारंभ रात्रौ 9:30 वा भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक रेकॉर्ड डान्स स्पर्धा अश्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विद्याधर कदम, संघटक संजय पाटील,कोषाध्यक्ष नंदकुमार कासले,महासचिव अशोक कांबळे, उपाध्यक्ष सुधिर धामणकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप सावंत, संघटक आनंद धामापुरकर, सरपंच, ग्रामपंचायत तरंदळे सुशिल कदम,कणकवली तालुकाध्यक्ष अनिल तांबे, उपसरपंच, ग्रामपंचायत तरंदळे शुभावली सावंत, तरंदळे, सल्लागार भरत कदम, तरंदळे, ज्येष्ठ सल्लागार सुनिल कदम, तंटामुक्त अध्यक्ष, तरंदळे जयसिंग नाईक, माजी सरपंच, ग्रामपंचायत तरंदळे सुधीर सावंत, सामाजिक कार्यकर्ते राजेश हिर्लेकर, माजी सरपंच, ग्रामपंचायत तरंदळे राजेश फाटक, सामाजिक कार्यकर्ते सागर सावंत-भोसले, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत तरंदळे संदेश सावंत, माजी अध्यक्ष विशाल कदम, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सत्यवान राणे हे उपस्थित राहणार असून या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन आदर्श बौद्ध विकास मंडळ तरंदळे व माता रमाई महिला मंडळ पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!