खारेपाटण (प्रतिनिधी): कणकवली तालुकयातील चिंचवली मधलीवाडी जि.प.शाळेच्या मुख्यद्यापिका प्रभा प्रकाश अकिवाटे यांची नुकतीच जि.प.शाळा नडगिवे नं.१ येथे सेवांतर्गत बदली झाल्याबद्दल चिंचवली मधलीवाडी शाळेच्या वतीने त्यांचा सदिच्छा समारंभ नुकताच १ मे महाराष्ट्र दिनी चिंचवली मधलीवाडी शाळेत संपन्न झाला. मे २०१६मध्ये अकिवाटे मॅडम शाळा शिडवणे नं.१ येथून पदवीधर शिक्षिका म्हणून चिंचवली मधलीवाडी शाळेत बदलीने हजर झाल्या होत्या. गेली सात वर्ष त्यांनी चिंचवली मधलीवाडी शाळेत आदर्शवत असे शैक्षणिक कामकाज केले. नोव्हेंबर २०१९पासून त्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून काम पाहत होत्या. आपल्या मुख्याध्यापक पदाच्या काळात त्यांनी शैक्षणिक उठावातून शाळेसाठी विविध वस्तू चिंचवली ग्रामस्थांच्या माध्यमातून शाळेसाठी प्राप्त केल्या. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अकिवाटे मॅडमचा चिंचवली मधलीवाडी शाळेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत भालेकर,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नम्रता कोलते, उपाध्यक्ष दिनेश पांचाळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व महालक्ष्मी मातेची प्रतिमा देऊन हृदयपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी सूर्यकांत भालेकर, नम्रता कोलते यांनी अकिवाटे मॅडमना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. “चिंचवली मधलीवाडी शाळेत मला खूप काही शिकता आले. येथील ग्रामस्थ, पालक खूप चांगले असून त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच चिंचवली मधलीवाडी शाळा आदर्श बनवण्यात मला खूप मदत झाली. ही शाळा माझ्या सदैव स्मरणात राहील.” असे भावपूर्ण उदगार अकिवाटे बाई यांनी सत्कारला उत्तर देताना काढले. याप्रसंगी अकिवाटे मॅडम यांनी शाळेला ७५०० /- रुपये किमतीची एक पाण्याची टाकी सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत एक विद्यार्थिनी दत्तक घेण्यासाठी तीन हजार रुपये व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेच्या उपशिक्षिका सविता पवार यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.चिंचवली नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ गायकवाड यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.













