“श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्र” ११ कोटी लिखित नामजप संकल्प आणि श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा २०२७ उपक्रमाचा ३० मे रोजी होणार शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : “श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्राचा ११ कोटी ११ लाख ११ हजार १११ लिखित नामजप संकल्प २०२७” या भव्य उपक्रमाचा शुभारंभ सोहळा शनिवार, ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी “श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळा” तसेच नामजप, वही वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, स्वामी भक्तांसाठी भक्तीमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम सादर होणार आहेत. कार्यक्रमाचा शुभारंभ स्वामी भक्त नरेंद्र हेटे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती आयोजक अनिल देसाई महाराष्ट्र विद्यालय (सचिव) यांची लाभणार आहे. सायंकाळी ५ वाजता श्री स्वामी भक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, हा नामजप संकल्प नंदकुमार तुकाराम पेडणेकर संस्थापक सचिव यांच्या संकल्पनेतून साकार झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी नंदकुमार पेडणेकर (९८६९०१४१२३), अशोक गुराम (९९८७११३३८४) तसेच अजित पितळे (९३२३२२९०७४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!